अहमदाबाद : कधी कधी जिंकत आलेला सामना अवसानघातकी खेळी करून गमावणे आणि कधीकधी हाताबाहेर गेलेला सामना चिवट फलंदाजी किंवा गोलंदाजी करून खेचून आणणे हा आजवरचा पाकिस्तानचा (India Vs Pakistan) खेळ राहिला आहे. असाच काहीसा प्रकार आज वर्ल्डकपमधील (ICC Cricket World Cup 2023) महामुकाबल्यात दिसून आला. 






टीम इंडियाने फलंदाजी दिल्यानंतर पाकिस्तानने 29.4 षटकांमध्ये 3 बाद 155 अशी भक्कम मजल मारली होती. सलामीवीर स्वस्तात बाद होऊनही तिसऱ्या क्रमांकावर आलेला बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार खेळी करत संघाचा डाव सावरला होता. मात्र बाबर आझमला एका अप्रतिम चेंडूवर 50 धावांवर सिराजने क्लीन बोल्ड केल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यानंतर तो सावरलाच नाही. 






कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट, बुमराहचा बुम बुम 


त्यानंतर 33 व्या ओव्हरमध्ये अगदी शांती क्रांती करताना कुलदीप यादवने सौद शकीलल आणि इफ्तिकार अहमदला तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे तीन बाद 155 अशा सुस्थितीत पाकिस्तान वाटत असतानाच पाच आउट 166 अशी स्थिती झाली. त्यानंतर 34 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानची दांडी गुल करत बुमराहने पाकिस्तानला जबर हाजरा दिला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था सहा बाद 168 अशी झाली. त्यानंतर त्याने 36व्या षटकातही खतरनाक गोलंदाजी करताना शादाब खानलाही क्लीन बोल्ड करत पाकिस्तानला सातवा हादरा दिला.






त्यामुळे अवघ्या 17 धावांमध्ये पाकिस्तानचे चार फलंदाज बाद झाल्याने जो संघ 300 पर्यंत आरामात मजल मारेल असे वाटत असताना त्या संघाचा डाव पूर्णपणे कोलमडला. पाकिस्तानची मधली फळी बुमराह आणि कुलदीप यादवने भेरा भेदक मारा करत कापूनच काढली. दोघांनी दिलेल्या हदऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव पूर्णतः कोलमडला. त्यामुळे आता शेवटचे शेवटच्या चार विकेट किती धावा जोडतात यावर पाकिस्तानचे सामन्यातील गणित अवलंबून असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या