Babar Azam: पाकिस्तान विश्वचषक 2023 मधून (ICC Cricket World Cup 2023) बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, यादरम्यान संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) उपांत्य फेरी गाठण्यासाठी खास योजना आखली आहे. पाक कर्णधाराने सांगितले की तो निव्वळ रनरेटचे कोडे कसे सोडवेल आणि शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करेल. बाबरने संघाला उपांत्य फेरीत नेण्याचा दावा केला.






गुरुवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून पाकिस्तानसाठी आधीच कठीण असलेला उपांत्य फेरीचा मार्ग आणखी कठीण केला. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडला 287 धावांनी पराभूत करावे लागेल. तर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केल्यास  इंग्लंडला 50 धावांवर ऑलआउट करून 2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. याशिवाय 100 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर तीन षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे.










तर आम्हाला हवे ते साध्य करता येईल


इंग्लंडविरुद्धच्या नेट रन रेटचा प्रश्न सोडवण्याबाबत बोलताना, सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बाबर म्हणाला की, “क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. आम्ही स्पर्धेचा उच्चांकावर शेवट करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे नेट रन रेटची योजना आहे आणि आम्ही त्याचा वापर करू. पहिली 10 षटके कशी खेळायची आणि त्यानंतर काय करायचे याची योजना आहे.” तो पुढे म्हणाला, “जर फखरने 20-30 षटके खेळली तर आम्हाला हवे ते साध्य करता येईल. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.






टीव्हीवर बसून गोष्टी बोलणे सोपे आहे.


याशिवाय पाकिस्तानच्या कर्णधाराने अशा लोकांबद्दलही सांगितले जे सतत त्याच्यावर टीका करत आहेत. बाबर पुढे म्हणाले, माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी तीन वर्षे कर्णधार आणि कामगिरी करत होतो. टीव्हीवर बसून गोष्टी बोलणे सोपे आहे. ज्यांना मला सल्ला द्यायचा असेल त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क साधावा. सध्या माझे लक्ष पुढील सामन्यावर आहे. कर्णधारपदाच्या भविष्याबद्दल मी नंतर विचार करेन.”


इतर महत्वाच्या बातम्या