लंडन :  रन मशीन विराट कोहलीने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसनी घातली आहे. विराटने केलेल्या विक्रमांच्या यादीत आज अजून एका विक्रमाची भर पडण्याची शक्यता आहे. इंगल्ंडमधील साऊदम्प्टन येथे भारत आज (शनिवारी) विश्वचषक स्पर्धेतील पाचवा सामना खेळणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आज दुबळ्या अफगाणिस्तानशी भिडणार आहे.


आज होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतल्या 20 हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. हा रेकॉर्ड करण्यासाटी विराटला केवळ 104 धावांची आवश्यकता आहे. आजच्या सामन्यात शतक करुन विराटने सर्वात जलद 20 हजार धावा करण्याचा विक्रम स्वतःच्या नावे करावा इशी त्याच्या फॅन्सची इच्छा आहे.

विराटने आतापर्यंत 415 डावांमध्ये (131 कसोटी, 222 एकदिवसीय आणि 62 टी20) 19 हजार 896 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत सर्वात जलद 20 हजार धावा करण्याचा विक्रम संयुक्तपणे भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा या दोघांच्या नावावर आहेत. दोघांनीही 453 डावांमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार केला होता. या दोघांनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा नंबर लागतो. त्याने 468 डावांमध्ये 20 हजार धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1. सचिन तेंडुलकर - 34357 धाव (664 सामने)
2. कुमार संगकारा - 28016 धावा (594 सामने)
3. रिकी पॉन्टिंग - 27483 धावा(560 सामने)
4. महेला जयवर्धने- 25357 धावा (652 सामने)
5. जॅक कॅलिस - 25534 धाव (519 सामने)
विराट कोहली या यादीत 12 व्या नंबरवर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1. सचिन तेंडुलकर - 18426 धावा (463 सामने)
2. कुमार संगकारा - 14234 धावा (404 सामने)
3. रिकी पॉन्टिंग - 13704 धावा(375 सामने)
4. सनथ जयसुर्या- 13430 धावा (445 सामने)
5. महेला जयवर्धने- 12650 धावा (448 सामने)