नवी दिल्ली : बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना कठोर शिक्षा करण्यात आली. त्यामुळे आता स्टीव्ह स्मिथ पुन्हा कधीही कर्णधार बनू शकणार नाही, असं मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी व्यक्त केलं.


डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर बारा महिन्यांची बंदी घालून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने योग्य निर्णय घेतला आहे. मात्र स्मिथ आता कधीही राष्ट्रीय संघाचं नेतृत्त्व करु शकेल, असं वाटत नाही, असं चॅपल यांचं म्हणणं आहे.

''मी त्या दोघांना (स्मिथ आणि वॉर्नर) कधीही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून पाहू शकत नाही. कर्णधार म्हणून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या सहकाऱ्यांकडून सन्मान मिळवणं असतं,'' असंही चॅपल म्हणाले.

''केपटाऊन कसोटीत जो मूर्खपणा केला, ते पाहून असं मला नाही वाटत, की ते दोघे पुन्हा राष्ट्रीय संघात तोच सन्मान मिळवू शकतील. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्त्व करण्याचं विसरुन जावं,'' असंही चॅपल यांनी सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत बॉल टॅम्परिंग करताना आढळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार आणि उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर बारा महिन्यांची बंदी घालण्यात आली. याशिवाय या दोन्ही खेळाडूंना यंदाच्या आयपीएलमध्येही खेळता येणार नाही.

संबंधित बातमी :

स्मिथ आणि वॉर्नरची आयपीएलमधूनही हकालपट्टी!


स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी


वॉर्नर सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन पायउतार