इस्लामाबाद: पाकिस्तानात लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई सहा वर्षांनी मायदेशात, पाकिस्तानात आली. सहा वर्षांपेक्षाही अधिक काळ ती देशाबाहेर राहत होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मलाला मायदेशी आली.
तालिबानी दहशतवाद्यांनी 2012 मध्ये तिला यापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानात परतल्यानंतर मलाला पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी तसेच लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, यांच्यासह विविध मान्यवरांची भेट घेणार आहे.
पाकिस्तानात चार दिवस 'मिट मलाला' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी ती मायदेशी आली आहे.
मलाला पाकिस्तानातील महिला आणि लहान मुलींच्या शिक्षणांदर्भात काम करत असल्याने, तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर ऑक्टोबर 2012 मध्ये हल्ला चढवला होता.
या हल्ल्यात मलालाच्या डोक्याला दुखापत झाली होती. तिच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती. तिच्यावर लंडनमध्ये उपचार करण्यात आले.
या हल्लाचा जगभरातून निषेध करण्यात आला होता.
मुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालाला 2014 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
संबंधित बातम्या
मलाला युसुफझाई संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वात तरुण शांतिदूत
जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना
मलाला युसूफजाईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज