चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेची सुरुवात दणक्यात करुन टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं आहे. चेन्नईमधील पहिल्याच सामन्यात भारतानं कांगारुंवर 26 धावांनी मात करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याच विजयानंतर भारतीय संघ चेन्नई विमानतळावर रिलॅक्स मूडमध्ये दिसून आला.

कालच्या (रविवार) सामन्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरुवातीला अनेक धक्के बसले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण धोनी आणि पांड्यांच्या संयमी पण तितक्याच आक्रमक खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली.

पण या सामन्यात पावसामुळे बराच व्यतत्य आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, ऑस्ट्रेलियाला 21 षटकात  164 धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं. पण भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया संघाला फार चमकदार कामगिरी करता आली नाही. भारतानं हा सामना 26 धावांनी खिशात टाकला.

मात्र, हा सामना खेळाडूंना प्रचंड थकवा आणणारा होता. पण विजयानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांचा सर्व ताण कुठच्या कुठे निघून गेला.


दरम्यान, भारतीय संघाचा दुसरा सामना 21 सप्टेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ आज (सोमवार) चेन्नईहून कोलकाताला रवाना झाला. यावेळी विमानतळावर भारतीय संघ अगदीच रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळाला.

कोलकाताला जाण्यासाठी भारतीय संघ चेन्नई विमानतळावर आला होता. विमानाची वाट पाहत असताना सर्वच जण गप्पांमध्ये गुंतून गेले होते. त्यानंतर हळूहळू सर्वजण जिथे उभे होते तिथेच खाली बसले. कर्णधार कोहली, धोनी, केएल राहुल, हार्दिक पांड्या हे देखील खाली बसले. धोनीनं तर थोड्यावेळानं चक्क बसल्या जागीच लोळण घेतली. त्यांचे हे फोटो बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या :

हार्दिकसारखा खेळाडू संघात असणं ही भाग्याची गोष्ट : विराट

धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!

धडाकेबाज धोनीची नव्या विक्रमाला गवसणी  

दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक!