हिमा दासने मिल्खा सिंग आणि पीटी उषाचाही विक्रम मोडला
हिमा व्यतिरिक्त ज्युनियर जागतिक चॅम्पियनशीपमध्ये सीमा पुनियाने 2002 साली डिस्कस थ्रोमध्ये कांस्य आणि नवदीप कौर ढिल्लनने 2014 मध्ये डिस्कस थ्रो मध्येच कांस्य पदकावर नाव कोरलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमा दासने मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचाही विक्रम मोडला. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग चौथ्या क्रमांकावर होते, तर पीटी उषा 1984 सालच्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर होत्या.
हिमा दास जागतिक स्तरावर सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला अॅथलिट ठरली आहे.
हिमा दासपूर्वी या स्पर्धेत एकाही भारतीय अॅथलिटने सुवर्ण पदक जिंकलेलं नाही.
18 वर्षीय हिमा दासने हा विक्रम केवळ 51.46 सेकंदांमध्ये पूर्ण केला.
भारताची धावपटू हिमा दासने वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -