नवी दिल्ली : सिक्सर किंग युवराज सिंह नुकताच अभिनेत्री हेजल किचसोबत विवाहबंधनात अडकला आहे. मात्र युवराजने आणि त्याच्या कुटुंबाने हेजलला सून म्हणून का स्वीकारलं, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची सर्वच चाहत्यांना उत्सुकता आहे.
हेजलला सून म्हणून का स्वीकारलं याचा खुलासा खुद्द युवराजच्या आईनेच केला आहे. हेजल युवराजसाठी सर्व बाबतीत सुयोग्य ती अत्यंत शुद्ध अंतःकरणाची असल्याने आपण तिला स्वीकारलं, असं युवराजच्या आई शबनम सिंह यांनी सांगितलं आहे.
हेजलला कुटुंबाला वेळ द्यायला आवडतं तसंच ती घरावर प्रेम करणारी मुलगी आहे. युवराजने पाहिलेल्या इतर मुलींपेक्षा हेजल अत्यंत वेगळी मुलगी असून प्रेम तिच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणूनच सून म्हणून मी तिला निवडलं, असं शबनम सिंह यांनी सांगितलं.
हेजलला करिअरमध्ये काही करायचं असेल तर तिला नेहमी आमचा पाठिंबा असेल, असं शबनम सिंह म्हणाल्या. शिवाय युवराजला आपल्या आवडत्या मुलीच्या हातात सोपवल्याचं समाधान असल्याचंही त्या म्हणाल्या.