सोनसाखळी चोराचा धक्का, ट्रेनखाली पडल्याने तरुणीचा मृत्यू
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 07 Dec 2016 12:53 PM (IST)
मुंबई: प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणीच्या गळ्यातील साखळी चोरताना, चोरट्याने जोराचा हिसका मारल्याने तिचा रेल्वेखाली पडून मृत्यू झाला आहे. कुर्ला स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर ही दुर्घटना घडली. पीडित तरुणी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभी होती. त्याचवेळी एका भामट्यानं तिच्या गळ्यातली सोनसाखळी खेचली आणि तिला ढकललं. त्यामुळे समोरुन येणाऱ्या ट्रेनखाली येऊन तिचा मृत्यू झाला. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली. दरम्यान सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहे. चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.