या भेटीनंतर हसीनने पुन्हा एकदा मीडियासमोर येत शमीवर गंभीर आरोप केले आहेत. 'शमीने मला भेटण्यास नकार दिला. 'तुला कोर्टात पाहून घेऊ' अशी धमकीही त्याने मला दिली.' असं हसीन जहां म्हणाली.
वादानंतर शमी आणि हसीन यांची काल (मंगळवार) पहिल्यांदाच भेट झाली. याआधी शमीने अनेकदा मीडियासमोर येऊन पत्नी आणि मुलीच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती.
हसीनने थेट सोशल मीडियावरुन शमीवर अनेक आरोप केले होते. आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही तिने शमीवर केला होता. त्यानंतर तिने शमीवर मॅच फिक्सिंगसारखा गंभीर आरोपही केला होता.
हसीनच्या आरोपानंतर बीसीसीआयनेही शमीला कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं होतं. पण चौकशीअंती बीसीसीआयकडून त्याला क्लीन चिट देण्यात आली. तसंच त्याला कॉन्ट्रॅक्ट यादीतही स्थान देण्यात आलं. त्यामुळे त्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्गही मोकळा झाला.
VIDEO :
संबंधित बातम्या :
मी आजही शमीवर प्रेम करते : हसीन जहां
कार अपघातात मोहम्मद शमी जखमी, डोक्याला दहा टाके
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट : सूत्र
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी
मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी
कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?
दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां
फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा