मी आजही शमीवर प्रेम करते : हसीन जहां
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2018 08:21 AM (IST)
'तो माझ्यासोबत जे काही वागला त्याविरोधात माझी लढाई आहे. पण त्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली मी पाहू शकत नाही.'
नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दोन दिवसापूर्वी झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आपल्या जखमी पतीला भेटण्याची इच्छा हसीन जहां हिने व्यक्त केली आहे. देहरादूनहून दिल्लीला जात असताना शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली होती. या अपघातात शमीच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत. 'मी आजही त्याच्यावर प्रेम करते, कारण तो माझा पती आहे' 'तो माझ्यासोबत जे काही वागला त्याविरोधात माझी लढाई आहे. पण त्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली मी पाहू शकत नाही. तो भलेही मला पत्नी म्हणून स्वीकारत नसेल पण मी आजही त्याच्यावर प्रेम करते. कारण तो माझा पती आहे.' असं हसीन जहां म्हणाली. 'तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करेन' 'मी अल्लाकडे प्रार्थना करेन की, तो लवकर बरा व्हावा. मला त्याला भेटायचं आहे. पण त्याच्याशी कोणताच संपर्क होत नाही.' असंही हसीन म्हणाली. 'तो माझ्या फोन कॉलचं उत्तर देत नाही' 'मी फोनवरुन त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो फोनवर मला कोणतंही उत्तर देत नाही. एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबातील सदस्यही मला त्याच्याबाबत कोणतीही माहिती देत नाहीत.' अस म्हणत हसीनने शमीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संबंधित बातम्या :