मोहाली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या उजव्या खांद्यावर चेंडू आदळल्याने झालेली दुखापत गंभीर असून, त्याला किमान सहा आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रिद्धीमान साहापाठोपाठ पंड्याही संघाबाहेर राहणार आहे.


मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नेट्समध्ये सराव करताना हार्दिकच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या खांद्यात हेअरलाईन फ्रॅक्चर असल्याचं आढळून आलं आहे.

त्यामुळे हार्दिकला किमान सहा आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यांच्या मालिकेत त्याच्या शकण्याची शक्यता कमीच आहे.

याआधी सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि विकेटकीपर रिद्धीमान साहादेखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.