श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी पंड्याला विश्रांती
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2017 01:08 PM (IST)
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.
मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीनं भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला आहे. हार्दिक पंड्यावर अलीकडच्या काळात आलेला ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. संभाव्य दुखापतीचा धोका टाळण्यासाठी पंड्याला बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत मेहनत घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय संघासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतानं जर श्रीलंकेला व्हाईट वॉश दिल्यास ती भारताची ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे. तसेच यामुळे कर्णधार कोहली देखील यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेईल. संबंधित बातम्या :