मुंबई : टीम इंडियाचा 26 जुलैपासून श्रीलंका दौरा सुरु होणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने लूक बदलला आहे. त्याने या नव्या लूकचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

पंड्याने प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हाकिमकडून हा नवा लूक तयार केला आहे. आलिम हाकिमनेच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार विराट कोहलीचा नवा लूक तयार केला होता.


टीम इंडियाचा श्रीलंका दौरा

श्रीलंका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याचीही माहिती आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या काळात खेळवला जाणार आहे.

वन डे मालिकेची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी दंबुलाच्या मैदानातून होणार आहे. दुसरा आणि तिसरा वन डे अनुक्रमे 24 आणि 27 ऑगस्टला खेळवला जाईल. तर चौथा आणि पाचवा वन डे खेट्टाराम इथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर एकमेव टी-20 सामनाही खेळवला जाईल.

श्रीलंकेचा संघ यापूर्वी 2015 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. टीम इंडिया जवळपास एका वर्षानंतर परदेशात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने परदेशात अखेरचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. टीम इंडिया या दौऱ्यावर नव्या मुख्य प्रशिक्षकासोबत जाणार आहे.