Gujarat Titans Next Captain : आयपीएलच्या आगामी हंगामाची म्हणजेच आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. पुढील आयपीएल हंगामासाठी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे आणि त्याच लिलावासाठी ट्रेड विंडोचा शेवटचा दिवस 26 नोव्हेंबर होता. याचा अर्थ म्हणजे कोणत्याही आयपीएल संघाला एखादा खेळाडू ठेवायचा असेल, सोडायचा असेल, खेळाडूची देवाणघेवाण करायची असेल किंवा दुसऱ्या संघासोबत रोख रकमेचा व्यापार करायचा असेल, तर त्यासाठी अंतिम मुदत निश्चित केली जाते आणि आयपीएल 2024 लिलावासाठी 26 नोव्हेंबरची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली.


गुजरात टायटन्सचे नेतृत्व कोण करणार?


यावेळी, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय व्यवहार झाला, ज्याची गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर चर्चा होत होती. IPL 2022 मध्ये आपला प्रवास सुरू करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने आपला कर्णधार हार्दिक पंड्याला सोडले, ज्याने त्यांना पहिल्या सत्रातच चॅम्पियन बनवले होते आणि दुसऱ्या सत्रातही त्यांना सहज फायनलमध्ये नेले होते. हार्दिक पांड्या आता त्याच्या जुन्या टीम मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. अशा स्थितीत गुजरात टायटन्सचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 






केन विल्यमसन


लिलावापर्यंत, गुजरात संघात कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे केन विल्यमसन असून ज्याला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. तो न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार आहे, आणि त्याने अनेक वेळा आपल्या संघाला ICC टूर्नामेंटच्या बाद फेरीपर्यंत नेले आहे. याशिवाय केनला आयपीएलमधील कर्णधारपदाचाही भरपूर अनुभव आहे. त्याने आपल्या जुन्या संघ सनरायझर्स हैदराबादसाठी खूप कर्णधारपद भूषवले आहे. तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या कर्णधारपदाने अनेक वेळा जगभरातील महान क्रिकेटपटूंना प्रभावित केले आहे. अशा स्थितीत केन विल्यमसनच्या रूपाने गुजरातकडे एक उत्तम पर्याय आहे.


राशिद खान


अफगाणिस्तानच्या फिरकी अष्टपैलू खेळाडूची गुजरात संघात खूप महत्त्वाची भूमिका आहे. रशीद गेल्या दोन वर्षांपासून गुजरात संघाचा उपकर्णधारही होता. हार्दिकच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा गुजरातचे कर्णधारपदही भूषवले आहे. त्यामुळे गुजरातचा संघ रशीदला आपला मुख्य कर्णधार बनवू शकतो, अशीही शक्यता आहे.


शुभमन गिल


गुजरात संघाला भारतीय खेळाडूला कर्णधार बनवायचे असेल, तर शुभमन गिलच्या रूपाने त्यांच्याकडे चांगला पर्याय आहे, जो गेल्या वर्षभरापासून बॅटने धुमाकूळ घालत आहे. त्याच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव नसला तरी क्रिकेट दिग्गज त्याला भारताचा भावी कर्णधार म्हणतात. गुजरातनेही हार्दिकला कर्णधार बनवून सर्वांना चकित केले होते, कारण हार्दिकला कर्णधारपदाचा अनुभव नव्हता, पण त्याने पहिल्याच प्रयत्नातच संघाला चॅम्पियन बनवले होते. अशा स्थितीत गुजराज शुबमन गिलला आपला नवा आणि तरुण कर्णधार बनवू शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या