मुंबई : हार्दिक पंड्या हा भारतीय संघातला महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. दुखापतीमुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावं लागणार आहे. पण आपल्या भावाची भारतीय संघात निवड झाल्यामुळे तो खुश आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कृणाल पंड्याची निवड झाली आहे. शिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही पंड्या खेळणार आहे. यापूर्वी कृणालला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जागा मिळाली होती. आता पुढच्या मालिकांसाठीही त्याला संधी देण्यात आली आहे.

या निवडीनंतर हार्दिक पंड्याने भावाचं अभिनंदन केलं. शुभेच्छा देत तुझा अभिमान असल्याचं तो म्हणाला. या ट्वीटसोबत हार्दिकने कृणालसोबतचा फोटो शेअर केला आहे.


कृणालची इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. कृणालही त्याच्या भावाप्रमाणेच दमदार फलंदाजी करु शकतो.

संबंधित बातम्या :
... म्हणून टी-20 मध्ये धोनीला वगळून रिषभ पंतला संधी

बीसीसीआय धोनीऐवजी आता पंतला आजमवणार, रोहित शर्माचं कसोटीत पुनरागमन