हार्दिक पंड्यांने रविवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दोन्ही खेळाडू बिनधास्त पद्धतीने डान्स करत आहेत. हे दोघेही इंग्रजी गाण्यावर पंजाबी डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हार्दिक आणि शिखरचा हा बाथरुम डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडू एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. भारत उद्यापासून इंग्लंडबरोवर दोन हात करणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये तीन टी-20, तीन एकदिवसीय सामने आणि 5 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.