मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फलंदाजी कमकुवत असल्याचं हरभजनने म्हटलं आहे.
इंदूरमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन टीम पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने ट्वीट केला होता की, “कांगारु टीम जवळपास 40 धावांनी मागे राहिली.”
त्यानंतर, मायकल क्लार्कच्या ट्वीटला कोट करुन हरभजन सिंगने ट्वीट केला की, “पूर्वी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उत्तम कामगिरी करत, त्यांच्या तुलनेत आताच्या ऑस्ट्रेलियन टीममधील फलंदाज कमकुवत झाले आहेत.”
हरभजनने मायकल क्लार्कला उद्देशून असेही म्हटले की, “क्लार्क, तू निवृत्तीतून परत येऊन फलंदाजी सुरु करायला हवीस. ऑस्ट्रेलियामध्ये आता उत्तम फलंदाज राहिले नाहीत. मला वाटतं ऑस्ट्रेलियन टीममध्ये आता पहिल्यासारखी ताकद राहिली नाही.”
दरम्यान, हरभजन सिंग आणि क्लार्क यांच्यातील या 'ट्वीट-कोट ट्वीट'ला ट्विटरवर फॉलोअर्सनेही मोठ्या प्रमाणात रिट्विट करत व्हायरल केले.
https://twitter.com/harbhajan_singh/status/911950140222476290