राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेनेच्या अरविंद भोसलेंवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2017 09:39 AM (IST)
महापालिकेतील वरिष्ठ निरीक्षक दिलीप कारखानीस यांच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
मुंबई : नारायण राणे यांच्या विरोधात केलेली पोस्टरबाजी शिवसेनेच्या अंगलट आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि प्रवक्ते अरविंद भोसले यांच्याविरोधात मुंबईतील वरळी पोलिस स्थानकात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील वरिष्ठ निरीक्षक दिलीप कारखानीस यांच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला. अरविंद भोसले यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत पोस्टरमधून टीका केली होती. नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं.