Shardul Thakur: आयपीएलच्या चेन्नई संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरचा आज वाढदिवस. शार्दुलचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी पालघर येथे झाला. गेल्या एका वर्षात शार्दुलने टेस्ट, वनडे आणि टी20 सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात  ब्रिस्बेन टेस्ट आणि इंग्लंड विरोधात ओवल टेस्टमध्ये शार्दुलने भारताला विजय मिळवून विशेष योगदान दिले. आयपीएलमध्ये चेन्नई संघातील सर्वांत जास्त विकेट घेणारा खेळाडू शार्दुल ठरला आहे. शार्दुलने या आयपीएलच्या सिझनमधील 16 सामन्यामध्ये 21 विकेट घेतल्या आहेत. 


अष्टपैलू खेळाडू असलेल्या शार्दुलने 2017 मध्ये श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यामध्ये भारताकडून डेब्यू केला होता. एक वर्षानंतर त्याला टी 20 संघामध्ये घेण्यात आले. 2018 मध्ये आयपीएल जिंकलेली टीम चेन्नईमध्ये शार्दुल होता. शार्दुलनं 2018 साली टेस्ट डेब्यू केला होता. पण नंतर पुन्हा संघात येण्यासाठी त्याला दोन वर्ष लागली.  
 
एका मुलाखतीमध्ये शार्दुलने सांगितले की, जेव्हा तो टेस्ट टीमच्या बाहेर होता तेव्हा त्याला महेंद्र सिंह धोनीमुळे  मदत मिळाली होती. शार्दुलने सांगितले, 'जेव्हा धोनी त्यांचे अनुभव शेअर करत असतात. तेव्हा त्या अनुभवांमधून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ते असे व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडून नेहमी काही तरी नवं शिकायला मिळते. जर तुम्ही हुशार असाल तरच तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या गोष्टी समजतील. ' 


CSK Won IPL 2021: चेन्नईचा दबदबा, फायनल सामन्यानंतर चेन्नईच्या नावावर अनेक विक्रम


आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने शार्दुलला टी20 वर्ल्ड कप संघामध्ये घेण्यात आले. आधी त्याची  रिझर्व्ह खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. मुंबई क्रिकेट सर्कलमध्ये शार्दुल ठाकूरला त्याच्या गोलंदाजीमुळे  'पालघर एक्सप्रेस' असे म्हणले जाते.  रणजी ट्रॉफी 2014-15 मध्ये  शार्दुलने 48 विकेट घेतल्या होत्या.  शार्दुलने त्याच्या डेब्यू मॅचमध्ये सचिन तेंडूलकर यांचा नंबर असणारी 10 नंबरची जर्सी घातली होती. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर अनेकांना ट्रोल केले होते. त्यानंतर त्याने जर्सीचा नंबर बदलून 54 केला.  शार्दुलचे चाहते त्याला 'लॉर्ड' म्हणतात.


Rahul Dravid: टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार