मुंबई : भारतीय संघातील वेगवान गोलंदाज (Mohammed Siraj) मोहम्मद सिराज याला त्याच्या 27 व्या वाढदिवसानिमित्त क्रीडा क्षेत्रासमवेत इतरही अनेक क्षेत्रातून या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारतीय संघासाठी खेळणं म्हणजे सिराजसाठी जणू एक स्वप्न. वडील एक रिक्षा चालक असल्यामुळं सिराजची स्वप्न पूर्ण करण्यासाठीही त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. पण, क्रिकेटप्रती असणाऱ्या समर्पकतेपोटीच तो आज या टप्प्यावर पोहोचू शकला. 


आजच्या घडीला भारतीय संघासाठी गोलंदाजी करणारा सिराज कधीही कोणत्याही क्रिकेट अकादमीत गेला नाही. पण, हैदराबादच्या चिंचोळ्या गल्लीबोळात खेळत असतानाच त्यानं आपल्या खेळावरही पूर्ण लक्ष केंद्रीत केलं. आजमितीस सिराजच्या दारी कोट्यवधींची आलिशान कार उभी आहे. पण, तुम्हाला यावर विश्वासही बसणार नाही, की एका क्रिकेट सामन्यात चांगल्या प्रदर्शनासाठी त्याला 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं होतं. त्या सामन्यामध्ये त्यानं 9 गडी बाद केले होते. ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आलं होतं.


Sachin Tendulkar Video : ... आणि सचिन तेंडुलकरनं मेडिकल स्टाफला घाबरवलं!


 





2017 मध्ये न्यूझीलंडविरोधातील सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण 


2017 मध्ये विजय हजारे चषकामध्ये चांगली कामगिरी केल्यामुळं रेस्ट ऑफ इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या टीम ए मध्ये त्याची निवड करण्यात आली होती. याचवर्षी राजकोटमध्ये न्यूझीलंडविरोधात झालेल्या टी20 सामन्यातही त्याला स्थान देण्यात आलं होतं. या सामन्यामध्ये त्यानं 53 धावा देत 1 गडी बाद केला होता. ज्यामुळं संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी त्याचा बरीच धडपड करावी लागली होती. ज्यानंतर दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यासाठी त्याची एकदिवसीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली होती.