ओव्हल : भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीने पहिल्याच डावात उत्कृष्ट फलंदाजी केली. विहारीच्या याच खेळीमुळे भारतीय संघाचं सामन्यातील आव्हान कायम राहण्यास मदत झाली. विहारीने पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावलं आणि एका विक्रमावर आपलं नाव कोरलं.


विहारीने अर्धशतक ठोकल्याने पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक ठोकणारा तो 26वा खेळाडू ठरला आहे. विहारीच्या आधी हार्दिक पांड्याने हा कारनामा केला होता.


याशिवाय करिअरच्या पहिल्याच डावात इंग्लंडमध्ये अर्धशतक ठोकणार विहारी चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी रुसी मोदी 1946मध्ये 57 धावा, सौरव गांगुलीने 1996मध्ये 131 आणि आणि राहुल द्रविडने 1996मध्ये 95 धावा केल्या होत्या.


इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या तीन कसोटी सामन्यांनंतर जाहीर करण्यात आलेल्या संघात हनुमा विहारीची निवड झाली होती. मात्र, चौथ्या सामन्यात विहारीला संघात जागा मिळाली नव्हती. अखेर शेवटच्या सामन्यात विहारीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि या संधीचं विहारीनं सोनं केलं.


संबधित बातम्या 


ओव्हल कसोटी : तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 154 धावांची आघाडी


VIDEO: भर मैदानात शिखर धवनचा भांगडा


अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च!


इंग्लंडमध्ये नव्या विक्रमासाठी ईशांत सज्ज


गिलख्रिस्टकडून भारताला विदेशात जिंकण्यासाठी कानमंत्र