नवी दिल्लीः भारतीय जिम्नॅस्टिक्सची नायिका दीपा कर्माकर आणि पिस्टल नेमबाज जीतू रायची यंदाच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराची निवड करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीने दीपा आणि जीतूच्या नावाला पसंती दिली.


 

क्रीडाविश्वात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या भारतीय खेळाडूंना क्रीडादिनी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी दरवर्षी सन्मानित केलं जातं. दीपाने रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात चौथं स्थान मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक फायनल गाठणारी ती पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट ठरली होती.

 

जीतू रायने यंदा बाकू आणि बँगकॉकमध्ये झालेल्या विश्वचषकांत आणि 2014 च्या जागतिक स्पर्धेत पदकांची कमाई केली होती. यंदा ऑलिम्पिकमध्येही जीतूने 10 मीटर पिस्टल नेमबाजीची अंतिम फेरी गाठली होती. जीतू आणि दीपाशिवाय रिओ ऑलिम्पिमकध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना थेट खेल रत्न दिला जाणार आहे.