मुंबई : फॅन्सी ड्रेस स्पर्धेत महात्मा गांधी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांच्यापासून ऐश्वर्या राय, कल्पना चावला यासारख्या राष्ट्रीय हिरोंची वेशभूषा बरेचदा केली जाते. मात्र स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत आयोजित स्पर्धेत एका चिमुरडीने महिला क्रिकेट कर्णधार मिताली राजसारखी वेशभूषा करुन वेगळेपण दाखवलं आहे. विशेष म्हणजे तिची दखल साक्षात खऱ्याखुऱ्या मिताली राजने घेतली आहे.

फॅन्सी ड्रेस स्पर्धांच्या निमित्ताने अनेक चिमुकले आपल्या स्वप्नातील व्यक्तिरेखा काही तासांसाठी जगून पाहतात. गुजरातमधल्या एका शाळेत आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धेत एका चिमुरडीने भाग घेतला. 'राष्ट्रीय नायक' अशी थीम या स्पर्धेसाठी देण्यात आली होती. त्यावेळी चिमुकलीने मिताली राजची वेशभूषा केली.

तिचे वडील अपूर्व एकबोटे यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ पाहून खुद्द मिताली राजने प्रतिक्रिया दिली आहे. 'हे खूपच क्युट आहे. देव करो आणि कुठल्याही क्षेत्रात तिच्या प्रयत्नांना यश मिळो' असं मितालीने म्हटलं आहे.

https://twitter.com/aekbote/status/895481116064227328

https://twitter.com/M_Raj03/status/895578078130298880