German football legend Thomas Muller : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल महामुकाबला 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत होत आहे. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये एकही पराभव न स्वीकारता दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला चितपट करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ICC क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पहिल्या उपांत्य फेरीत कोणत्या संघाला सपोर्ट करणार? हे जर्मन फुटबॉलपटू थॉमस म्युलरनं स्पष्ट केलं आहे.
बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा भारताचा या स्पर्धेत दुसऱ्यांदा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. म्युलर टीम इंडियासाठी सज्ज झाला आहे. म्युलरनं टीम इंडियाची निळी जर्सी परिधान केलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही जर्सी टीम इंडियाने जर्मनीच्या विश्वचषक विजेत्यांसाठी दिलेली भेट आहे. पाठीवर म्युलरचे नाव आणि 25 क्रमांक आहे. त्याने ट्विटरवर आपल्या ट्विटमध्ये विराट कोहलीला टॅग करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यूझीलंडने चार वर्षांपूर्वी मँचेस्टर येथे पावसाने घोळ घातलेल्या उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव करून भारताला रोखले होते. दरम्यान, 2019 प्रमाणे या स्पर्धेतही भारत टेबल टॉपर म्हणून उपांत्य फेरीत जाईल. स्पर्धेची चांगली सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडने साखळी फेरीत नऊ सामन्यांत पाच विजय मिळवून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलं आहे. साखळी लढतीत न्यूझीलंडला टीम इंडियाने नमवून 20 वर्षांची परंपरा खंडित केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या