शहीदांना श्रद्धांजली वाहताना गंभीरनं 'या' क्रिकेटरवर निशाणा साधला?
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2016 04:27 PM (IST)
मुंबई: क्रिकेटर गौतम गंभीरनं आज उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली. पण यावेळी गंभीरनं ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहताना अप्रत्यक्षपणे धोनीवर निशाणा साधला आहे. गंभीर म्हणाला की, बाओपिक आमच्या शहीद जवानांनवर बनायला हवं, एखाद्या क्रिकेटर नाही. गंभीरनं धोनीचं नाव न घेता ट्वीट केलं की, 'हे सर्व 17 शहीद जवान बाओपिकच्या लायक आहेत. एखादा क्रिकेटर नाही. यापेक्षा उत्कृष्ट प्रेरणा स्त्रोत दुसरा असूच शकत नाही. जे देशासाठी आपल्या उमदेचीच्या काळात आपले प्राण पणाला लावतात. गंभीरनं ट्विटरवरुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच नवा न घेता धोनीवर निशाणा साधला. कारण की, 30 तारखेला कर्णधार धोनीवर आधारित सिनेमा रिलीज होणार आहे.