गौतम गंभीरच्या मुलीचं नामकरण, सोशल मीडियावर चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2017 10:09 PM (IST)
मुंबई : क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपल्या दुसऱ्या मुलीचं नाव ट्विटरवर जाहीर केलं. त्यानंतर तिच्या अनोख्या नावाचा अर्थ जाणण्यासाठी सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. गेल्या महिन्यात गंभीरला दुसरी मुलगी झाली. बुधवारी त्याने मोठी मुलगी आझीनने बाळाला हातात धरलेला फोटो ट्वीट केला. 'आमच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दोन राजकन्या - आझीन आणि अनैझा' असं कॅप्शन या फोटोला दिलं. https://twitter.com/GautamGambhir/status/885170046393253888 अनैझा हे नाव चाहत्यांसाठी नवीन होतं. त्यामुळे साहजिकच त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी चाहत्यांच्या उड्या पडल्या. गौतमने त्याचं उत्तर दिलं नसलं, तरी एका चाहत्यानेच त्याचा अर्थ 'सन्माननीय स्त्री' असल्याचं सांगितलं. गौतमचं लग्न ऑक्टोबर 2011 मध्ये नताशा सोबत झालं. 1 मे 2014 रोजी त्याची मोठी मुलगी आझीनचा जन्म झाला होता.