बंगळुरु : आयपीएलच्या अकराव्या मोसमात गौतम गंभीरचं दिल्ली डेअरडेव्हिल्स या होम टीममध्ये पुनरागमन झालं आहे. गंभीर दिल्ली संघाचा कर्णधार असेल, असे स्पष्ट संकेत मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी त्याचं पुनरागमन होताच दिले आहेत.


गौतम गंभीरने आयपीएलमध्ये यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व केलं होतं. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने दोन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला आहे. मात्र यावेळी केकेआरने त्याला रिटेन केलं नाही.

यंदाच्या आयपीएल लिलावात गंभीरची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर बोली लावत दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 2.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.

दिल्लीच्या संघात पुनरागमन होताच गंभीरने आनंद व्यक्त केला आहे. आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

संबंधित बातम्या :

जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली


आयपीएल लिलाव : पहिला दिवस स्टोक्सचा, गेल, मलिंगावर बोली नाही


IPL Auction 2018 : हैदराबादची पंजाबवर मात, मनीष पांडेवर 11 कोटींची बोली