लाहोरः पाकिस्तानचे माजी कसोटीपटू आणि पंच जावेद अख्तर यांचं वृद्धापकाळाने रावळपिंडी येथील राहत्या घरी निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अख्तर यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंच म्हणून दीर्घकाळ काम केलं आहे.

 

अख्तर यांची पंच कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली. त्यांनी एकूण 18 कसोटी आणि 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केलं आहे. अख्तर यांनी पाकिस्तानकडून केवळ एकच कसोटी खेळली आहे.

 

वादग्रस्त कारकीर्द

अख्तर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1940 साली दिल्ली येथे झाला. अख्तर यांनी पाकिस्तान संघाकडून इंग्लंडविरुद्ध केवळ एकच कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्यांना संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्यांनी पंच म्हणून दीर्घकाळ काम केलं. पंच म्हणून त्यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली.

 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या 1999 साली झालेल्या विश्वचषकातील सामना अख्तर यांचा शेवटचा सामना होता. या सामन्यात जवागल श्रीनाथ यांना एलबीडब्ल्यू आऊट देण्याचा अख्तर यांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यांच्यावर नेहमीच विविध आरोप करण्यात आले.