भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि फलंदाज युसुफ पठाणला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता सुब्रमण्यम बद्रीनाथला देखील कोरोनाची लागण झाली आहे. बद्रीनाथ Road Safety टी20 Series मध्ये सहभागी झाला होता. कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: बद्रिनाथने दिली होती. सध्या तो घरी क्वारंटाईन आहे.
दरम्यान वर्ल्ड रोड सेफ्टी टी20 मालिकेत सहभागी झालेल्या इंडिया लीजेंड्सच्या टीमचे तीन खेळाडू कोरोनाबाधित आहे. तसेच अजून पाच खेळाडूंना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. बद्रीनाथ अगोदर माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर आणि युसूफ पठाणला कोरोनाची लागण झाली होती.
ब्रदीनाथने 2018 मध्ये क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. बद्रीनाथने भारतीय संघासाठी दोन मालिका, सात वनडे, एक टी20 इंटरनॅशनल मॅच खेळला आहे. टेस्टमध्ये बद्रिनाथने 68 धावा, वनडेमध्ये 79 धावा तर टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 43 रन केले आहेत. या शिवाय बद्रिनाथने आयपीएलच्या 95 खेळल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जकडून बद्रिनाथ खेळत होता.
नुकतचं सचिननं रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग घेतला होता. यात सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सनं शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकेत सचिननं देखील चांगली कामगिरी केली होती.