Cristiano Ronaldo: फिफा विश्वचषकापूर्वी जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप केले आहेत. मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन हागसह (Ten Hag) दोन-तीन लोक आहेत, जे त्याला क्लबमध्ये पाहू इच्छित नसल्याचं त्यानं म्हटलं होतं. ज्यानंतर क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली. दरम्यान, रोनाल्डोच्या आरोपांवर मँचेस्टर युनायटेडकडून (Manchester United) स्पष्टीकरण देण्यात आलंय.
मँचेस्टर युनायटेडचं स्पष्टीकरण
मँचेस्टर युनायटेडनंमँचेस्टर युनायटेडनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'मँचेस्टर युनायटेड ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मुलाखतीबाबत मीडिया कव्हरेजवर लक्ष ठेवून आहे. सर्व तथ्य समोर आल्यानंतर क्लब आपल्या उत्तराचा विचार करेल. आमचे लक्ष सीझनच्या दुसऱ्या सहामाहीसाठी तयारी करण्यासह खेळाडू, व्यवस्थापक, कर्मचारी आणि चाहते यांच्यात निर्माण झालेला तेढ, विश्वास आणि एकजुटता कायम ठेवण्यावर आहे.
ख्रिस्तीयानो रोनाल्डोचं आरोप काय आहेत?
पीयर्स मोर्गनच्या अनसेंसर्ड टीवी शोमध्ये एरिक टेन हॅगबद्दल म्हणाला की, "माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर नाही, कारण तोही माझा आदर करत नाही. जर तुम्हाला माझ्याबद्दल आदर नसेल तर, मलाही तुमच्याबद्दल कधीही आदर वाटणार नाही. फक्त प्रशिक्षकच नाही तर, क्लबमध्ये असे आणखी दोन-तीन लोक आहेत", असं रोनाल्डो म्हणाला. क्लबच्या वरिष्ठ क्लब एक्झिक्युटिव्हला त्याला बाहेर काढायचं आहे का? असं रोनाल्डोला विचारण्यात आलं. यावर रोनाल्डोनं उत्तर दिलं की, 'हो मला वाटतं की माझी फसवणूक झालीय आणि मला असंही वाटतं की काही लोक मला येथे पाहू इच्छित नाहीत. ही केवळ या वर्षीची गोष्ट नाही, तर मागील वर्षीही असंच काहीसं घडलं होतं."
या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वीच रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेड सोडायचं असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक एरिक टेन हॅग यांच्यात मतभेद सुरू असल्याचं वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत होतं. गेल्या महिन्यात टॉटेनहॅम हॉटस्परविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोनं सब्सिट्यूट म्हणून खेळण्यास नकार दिल्यानं त्यांच्यातील मतभेद समोर आलं. यानंतर रोनाल्डो पुढील काही सामन्यांमध्ये मँचेस्टर युनायटेड संघातून बाहेर राहिला. अलीकडेच तो अॅस्टन व्हिलाविरुद्धच्या सामन्यात संघात परतला. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर रविवारच्या सामन्यात रोनाल्डो पुन्हा एकदा संघाबाहेर राहिला.
हे देखील वाचा-