Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) आजपासून सेमीफायनच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. एकूण 32 देशांनी स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर आधी ग्रुप स्टेज, मग बाद फेरीचे आणि अखेर उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडल्यानंतर आता सेमीफायनलचे सामने सुरु होणार आहेत. क्रोएशिया, अर्जेंटिना, फ्रान्स आणि मोरोक्को हे चार संघ सेमीमध्ये पोहोचले असून आज पहिला सेमीफायनलचा सामना पार पडणार आहे. विशेष म्हणजे सर्व जगाचं लक्ष लागलेल्या लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा संघ आज सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आज मध्यरात्री क्रोएशियाविरुद्ध हा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्याचं अर्थात वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचणार आहे.  

अर्जेंटिना आणि क्रोएशिया संघामध्ये आजवर झालेल्या सामन्यांना विचार करता दोघांमध्ये अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. 1994 मध्ये एका मैत्रीपूर्ण सामन्यात दोन्ही संघ एकही गोल करु न शकल्याने 0-0 असा स्कोर राहिला. त्यानंतर 1998 मध्ये वर्ल्ड कप ग्रुप स्टेजमध्ये  अर्जेंटिनाने 1-0  ने विजय मिळवला. 2006 मध्ये पुन्हा एका मैत्रीपूर्ण सामन्यात दोघे आमने-समने आले असता, क्रोएशियाने 3-2 असा विजय मिळवला. 2014 मध्ये देखील फ्रेंडली मॅचमध्ये अर्जेंटिना संघाने 2-1 ने विजय मिळवला असून 2018 च्या वर्ल्डकपमध्ये क्रोएशियाने 3-0 असा मोठा विजय मिळवत आपला दबदबा निर्माण केला असून आजचा सामना मात्र दोन्ही संघाच्या इतिहासातील एकमेंकाविरुद्धचा अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे.

कधी, कुठे पाहाल सामना?

हा अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया सामना भारतीय वेळेनुसार आज मध्यरात्री 12.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

फिफाच्या सेमीफायनल सामन्याचं वेळापत्रक-

सामना संघ दिनांक वेळ
पहिला सेमीफायनलचा सामना क्रोएशिया vs अर्जेंटीना 14 डिसेंबर रात्री उशिरा 12.30 वाजता
दुसरा सेमीफायनलचा सामना मोरक्को vs फ्रान्स 15 डिसेंबर रात्री उशिरा 12.30 वाजता
 

हे देखील वाचा-

FIFA WC 2022 : फिफा विश्वचषकाचे केवळ चार सामने शिल्लक, गोल्डन बूटच्या शर्यतीत कोणते खेळाडू आघाडीवर