आज 5 फेब्रुवारीला रोनाल्डो आणि नेयमार या दोघांचाही वाढदिवस आहे. स्पॅनिश क्लब रिअल माद्रिद आणि पोर्तुगाल राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार रोनाल्डो याचा आज 34 वा तर ब्राझील फुटबॉल संघ आणि पीएसजीचा स्टार स्ट्रायकर नेयमार याचा आज 27 वा वाढदिवस आहे.
पाच वेळा बॅलॉन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या रोनाल्डोने रिअल माद्रिद सोडून युवेन्टस हा संघ निवडला, रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी हा फारच मोठा धक्का होता. ब्राझीलच्या नेयमारनेसुद्धा बार्सिलोनाचा संघ सोडून फ्रान्सच्या पीएसजी या संघाची निवड केली. नेयमारने सध्या पायाच्या दुखापतीमुळे विश्रांती घेतली आहे.
नेयमार फुटबॉलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. बार्सिलोना सोडल्यानंतर पीएसजीने नेयमारसोबत 198 मिलियन पाऊंड्सचा करार करुन आपल्या संघात समाव्श केला. नेयमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी पॅरिसमध्ये एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या सोहळ्यास नेयमारचे कुटंबीय तसेच पीएसजी संघाचे त्याचे सहकारी उपस्थित होते.
ट्विटरवर रोनाल्डोच्या चाहत्यांनी #CR7 हे हॅशटॅग वापरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.