तब्बल 83 वर्षांनंतर पहिल्यांदाच वानखेडेवर मुंबईकर खेळाडू नाही
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2016 02:36 PM (IST)
मुंबई : मुंबईत सामना असताना अंतिम 11 मध्ये मुंबईकर खेळाडू नाही, असं 1933 नंतर पहिल्यांदाच घडलं आहे. शारदुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. मात्र त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकलं नाही. 1933 मध्ये बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर भारताच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये मुंबईकर खेळाडू नाही असं पहिल्यांदाच झालं आहे. कारण अजिंक्य रहाणेला दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. शारदूल ठाकूरचा मोहम्मद शमीला पर्याय म्हणून संघात समावेश करण्यात आलेला असला तरी या सामन्यात तरी त्याला संधी मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईत सामना होत असताना मुंबईकर खेळाडू संघात नसल्याचं 83 वर्षांनी पहिल्यांदाच घडलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज वानखेडेवर चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. संबंधित बातम्या :