रशिया : उरुग्वेच्या लुई सुआरेझनं कारकीर्दीतल्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला. त्याच्या याच गोलनं उरुग्वेला फिफा विश्वचषकात सौदी अरेबियावर १-० असा विजय मिळवून दिला.
विश्वचषकाच्या अ गटात उरुग्वेचा हा दुसरा विजय आहे. या विजयासह उरुग्वेनं अ गटातून रशियापाठोपाठ बाद फेरीचं तिकीट कन्फर्म केलं.
उरुग्वेचा या सामन्यातला एकमेव गोल लुई सुआरेझनं झळकावला. उरुग्वेला २३व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर सुआरेझला मोकळं सोडण्याची चूक सौदी अरेबियाला भोवली. त्यानं चेंडूला गोलपोस्टची दिशा देण्याचं काम चोख बजावलं.