रशिया : स्वीडननं दक्षिण कोरियाचा १-० असा पराभव करून, रशियातल्या फिफा विश्वचषकात विजयी सलामी दिली. विश्वचषकातला सलामीचा सामना जिंकण्याची स्वीडनची गेल्या साठ वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे.


१९५८ सालच्या विश्वचषकात स्वीडननं मेक्सिकोचा ३-० असा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली होती. पण त्यानंतर सात विश्वचषकांत स्वीडनला सलामीचा सामना कधीच जिंकता आला नव्हता.

अखेर रशियातल्या विश्वचषकात ती मालिका खंडित झाली. आंद्रियास ग्रानक्विस्टनं ६५व्या मिनिटाला पेनल्टी किकवर मारलेला गोल स्वीडनच्या विजयात निर्णायक ठरला.