कजान एरेना : फिफा विश्वचषकातील रोमांचक लढतीत स्पेनने इराणवर 1-0 ने मात केली. 2018 च्या विश्वचषकातील स्पेनचा हा पहिला विजय आहे. या विजयाने स्पेनने ब गटात अव्वल स्थान मिळवले आहे. एकमेव गोल मारत स्पेनचा स्ट्रायकर डिएगो कोस्टा सामन्याचा शिल्पकार ठरला. डिएगो कोस्टाचा या विश्वचषकातील तिसरा गोल आहे.


फुटबॉलवर कंट्रोल असलेली टीम म्हणून स्पेनची ख्याती आहे. परंतु या सामन्यात इराणच्या बचाव फळीने सुंदर खेळ करत स्पेनच्या खेळाडूंना रोखून धरले. 54 व्या मिनिटाला स्पेनचा स्ट्रायकर डिएगो कोस्टाने गोल मारत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

कजान येथे झालेल्या या सामन्यात इराणने स्पेनला चांगली टक्कर दिली. पूर्वार्धापर्यंत कोणत्याही  संघांना गोल मारता आला नाही. इराणच्या बचाव फळीला रोखण्यात स्पेनचे खेळाडू अपयशी ठरले.

उत्तरार्धापर्यंत स्पेनने इराणवर जोरदार आक्रमक केले. अखेरीस त्यांना यश आले. 54 व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल मारुन संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.

या सामन्यात इराणने एक गोल मारला, पण ऑफसाइडमुळे तो गोल वैध ठरला नाही. यामुळे अखेरीस स्पेनने या सामन्यात 1-0 ने विजय मिळवला.