रशिया : अलेक्झांडर कोलारोव्हनं फ्री किकवर मारलेल्या गोलनं विश्वचषकाच्या सामन्यात सर्बियाला कोस्टा रिकावर १-० असा विजय मिळवून दिला.
ई गटातल्या या सामन्यात सर्बिया आणि कोस्टा रिका या दोन्ही संघांनी एकमेकांच्या तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे या सामन्यात तब्बल ५६ मिनिटं बरोबरीची कोंडी फुटू शकली नव्हती. अखेर ५६व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर कोलारोव्हनं सामन्यातला एकमेव गोल डागला.
कोलारोव्हनं पंचवीस मीटर्सवरून मारलेल्या किकनं चेंडू ज्या वेगानं गोलपोस्टमध्ये जाऊन थडकला, तो वेग त्याच्या डाव्या पायातल्या ताकदीचा अंदाज देणारा होता. कोस्टा रिकाचा गोलरक्षक केलोर नवासला चकवून चेंडू गोलपोस्टमध्ये आदळला, त्या वेळी प्रेक्षकांनी तोंडात बोटं घातली.
सर्बियानं कोस्टा रिकावर मिळवलेला विजय त्यांना ई गटात लाभदायक ठरावा. याच गटात ब्राझिल आणि स्वित्झर्लंडसारख्या बलाढ्य संघांचा समावेश आहे. ब्राझिलचा बाद फेरीतला प्रवेश निश्चित आहे. त्यामुळं गटात दुसऱ्या क्रमांकासाठी स्वित्झर्लंड आणि सर्बिया संघांत चुरस राहिल.
FIFA World Cup 2018 : सर्बियाची कोस्टा रिकावर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jun 2018 09:07 PM (IST)
सर्बियानं कोस्टा रिकावर मिळवलेला विजय त्यांना ई गटात लाभदायक ठरावा. याच गटात ब्राझिल आणि स्वित्झर्लंडसारख्या बलाढ्य संघांचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -