येत्या ऑक्टोबर महिन्यापासून फिफाच्या या विश्वचषकाचं भारतात पहिल्यांदाच आयोजन केलं जात आहे. यात भारतासह 24 संघ सहभागी होणार असून भारतातील सहा शहरांमध्ये या विश्वचषकातील सामने खेळवले जाणार आहेत.
त्यातील आठ सामने हे नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमवर खेळवले जातील. त्यामुळे मुंबईतील फुटबॉल प्रेमींना या फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.
दरम्यान, फिफा अंडरच्या 17 फुटबॉल विश्वचषकासाठी संयोजन समिती आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कनं थीम साँग तयार केलं आहे. त्याचंही नुकतंच लोकार्पण करण्यात आलं. अमिताभ भट्टाचार्य लिखित या गीताचे बोल 'कर के दिखला दे गोल' असे आहेत. तर या गीताल संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलं आहे.
गाण्याचा व्हिडीओ पाहा