FIFA U-17 Women's World Cup : भारतात पुढच्या वर्षी 2021मध्ये होणारी महिला अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा रद्द करण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या स्थितीचा जगभरातील आढावा घेण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) हा निर्णय घेतला आहे. महिला अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे. आता 2022मध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे.


वेळापत्रकानुसार महिला अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात होणार होती. मात्र करोनामुळे ही स्पर्धा 2012 मध्ये 17 फेब्रुवारी – 07 मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र कोरोमुळे भारतातील परिस्थिती गंभीर बनत चालल्याने फिफाला वर्ल्ड कप स्पर्धेबाबात पुन्हा विचार करण्यास भाग पाडले. अखेर सध्याची करोनाची स्थिती पाहता आणखी काही काळ विश्वचषक लांबवणे योग्य होणार नसल्याचे ‘फिफा’ने स्पष्ट केले.


2022 मधील यजमानपद भारताकडे


2022 मधील महिला अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. कोस्टा रिकाला 2022 मध्येच होणाऱ्या 20 वर्षांखालील महिला विश्वचषकाचा मान देण्यात आला आहे,’’ असे ‘फिफा’ने स्पष्ट केले.  भारताने याआधी 2017 मध्ये पुरुषांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहेत. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन पाहून कुमारींच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय ‘फिफा’ने घेतला होता.