सामना सुरु असतानाच चक्क सरफराज भर स्टेडियमवरच जांभया देताना दिसला. कॅमेराच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. साहजिकच सरफराजचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले. पाकिस्तानी संघावर तोंडसुख घेताना मागे न पडणारे भारतीय चाहते आणखी तुटून पडले.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. रोहित आणि राहुलच्या जोडीने दणक्यात सुरुवात करुन दिली. खरं तर भारताची ही सुरुवात पाकची झोप उडवणारी होती. मात्र सरफराजला झोप आल्यामुळे पाकिस्तानी चाहतेही भडकले. कोणी सरफराजला 'स्लीप फील्डर' म्हणून डिवचलं, तर कोणी सरफराजने आशा सोडून दिल्याचं म्हटलं.
भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला.
पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. म्हणजे अवघ्या 5 षटकांत पाकिस्तानला 136 धावांचं अशक्य आव्हान मिळालं होतं.
सोशल मीडियावरील वायरल मेसेज