नवी दिल्लीः टीम इंडियात पुनरागमन झाल्यामुळे एखाद्या नवख्या खेळाडूला जशी पदार्पणाची उत्सुकता असते, तशी भावना आज अनुभवत आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. तब्बल दोन वर्षांचा काळ लोटल्यानंतर गंभीरचं न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात पदार्पण झालं आहे.

गौतम गंभीरचं टीम इंडियात पुनरागमन, जयंत यादवलाही संधी


 

''काहीही गमावलं नाही, देशासाठी पुन्हा एकदा खेळत आहे. मोठ्या काळानंतर टीम इंडियाची टोपी घालणार आहे. त्यामुळे माझ्या पदार्पणासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आणि बीसीसीआयने विश्वास दाखवल्याबद्दल आभार'', अशी भावना गंभीरने ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

https://twitter.com/GautamGambhir/status/780864531765473280

''पदार्पण करताना एखाद्या नवख्या खेळाडूला जी उत्सुकता असते, तोच अनुभव निवड झाल्यामुळे येत आहे. दोन वर्ष जाणवलेली अस्वस्थता, अशा अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या आहेत. त्यामुळे ईडन गार्डनच्या मैदानावर अनेक अपेक्षा घेऊन उतरणार आहे'', असं गंभीरने म्हटलं आहे.

https://twitter.com/GautamGambhir/status/780862899866644480