पोर्तुगाल युरो कपच्या अंतिम फेरीत, वेल्सवर मात
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2016 03:28 AM (IST)
लंडन : पोर्तुगालच्या फुटबॉल संघाने युरो कप 2016 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पोर्तुगालने पहिल्या सेमीफायनलमध्ये वेल्स 2-0 ने पराभूत करुन अंतिम फेरीत स्थान मिळवलं. पोर्तुगालतर्फे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नानी यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्टार फुटबॉलर रोनाल्डोने सामन्याच्या 50व्या मिनिटाला गोल करुन पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. त्यानतंर अवघ्या 3 मिनिटांनी म्हणजेच 53व्या मिनिटाला नानीने वेल्सच्या गोलकीपरला चकवा देत शानदार गोल केला.