मुंबई: क्रिकेटच्या मैदानात दररजो नवनवे विक्रम होत असतात. मात्र एकाच चेंडूवर सर्वाधिक किती धावा होऊ शकतात? जर नो किंवा वाईड बॉल असेल, तर जास्तीत जास्त धावा करता येऊ शकतात. मात्र जर तो बॉल नियमानुसार योग्य असेल, म्हणजे नो किंवा वाईड नसेल तर किती धावा करता येऊ शकतील? याचं उत्तर 6 असू शकतं. मात्र इंग्लंडमधील स्थानिक टी 20 क्रिकेट स्पर्धेत फलंदाजाने एका नियमित बॉलवर 7 धावा केल्या. केंट आणि समरसेट यांच्यात हा सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यात समरसेटचा फलंदाज स्टीव डेविसने एका बॉलमध्ये 7 धावा केल्या. डेविसने कवरच्या दिशेने फटका मारला, तो सीमारेषेपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याने तीन धावा काढल्या. त्यादरम्यान फिल्डरने विकेटकीपरकडे बॉल फेकला. मात्र फलंदाजाला धावबाद करण्यासाठी विकेटकीपरने गोलंदाजाकडे बॉल फेकला. पण त्या बाजूला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला तो चेंडू अडवता आला नाही. त्यामुळे तो चेंडू सरळ सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे आधीच्या तीन आणि ओव्हरथ्रोच्या 4 अशा 7 धावा एकाच चेंडूवर मिळाल्या. https://twitter.com/NatWestT20Blast/status/890637383980294145