नवी दिल्ली : टीम इंडियाविरुद्ध मागील सामन्यात नोंदवलेली धावसंख्या केवळ योगायोग नव्हता. आमची सर्वोत्तम कामगिरी होत आहे असं दाखवून देणारा खेळ आज अफगाणी क्रिकेटपटूंनी केला. विश्वविजेत्या इंग्लंडसमोर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत 284 धावा ठोकल्या. अफगाणिस्तानने 49.5 षटकात सर्व बाद 284 धावा केल्या. सुरुवात दमदार मग पडझड आणि पुन्हा कमबॅक असा अफगाणी फलंदाजीचा आलेख राहिला. अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमदुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झरदान यांनी दमदार फलंदाजी करताना पहिल्याच विकेटसाठी 16.4 षटका 114 धावांची दमदार सलामी दिली. त्यामुळे मोठ्या संख्येचा पाया रचला गेला. त्यानंतर तीन झटपट विकल्याचे गमावल्यामुळे अफगाणिस्तानचा डाव अडचणीत आला होता. मात्र, मधल्या फळीतील इक्रम अलीखीलने केलेल्या 58 धावांच्या खेळीमुळे अडीचशेचा टप्पा पार करता आला. रशीद खान आणि मजीफूर रहमान यांनीही छोटेखानी खेळी करत अफगाणिस्तानला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.


अफगाणिस्तानची वर्ल्डकपमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी त्यांनी 289 धावांचा डोंगर वेस्ट इंडिजविरुद्ध उभा केला होता. इंग्लंडकडून आदिलने 42 धावा ते तीन विकेट घेतल्या. 


अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या



  • 288 वि वेस्ट इंडीज, लीड्स, 2019

  • 284 वि इंग्लंड, दिल्ली, 2023*

  • 272 वि भारत, दिल्ली, 2023

  • 247 वि इंग्लंड, मँचेस्टर, 2019


विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक ५०+ धावा



  • 3 - हशमतुल्ला शाहिदी

  • 2 - नजीबुल्ला झद्रान

  • 2 - समिउल्ला शिनवारी

  • 2 - इकराम अलीखिल


विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी सहाव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावरील सर्वोच्च स्कोअर



  • 58 - इक्रम अलीखिल वि. ईएनजी, दिल्ली, 2023*

  • 56 - नजीबुल्ला झद्रान विरुद्ध न्यूझीलंड, नेपियर, 2015

  • 52 - मोहम्मद नबी विरुद्ध IND, साउथम्प्टन, 2019

  • 51 - नजीबुल्ला झद्रान वि AUS, ब्रिस्टल, 2019


विश्वचषकाच्या सामन्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंची सर्वाधिक षटके



  • 27.0 वि. साऊथ अफ्रिका, चेन्नई, 2011

  • 24.0 वि अफगाणिस्तान, दिल्ली, 2023*

  • 22.0 वि. श्रीलंका, लीड्स, 2019

  • 21.0 वि. श्रीलंका, पेशावर, 1987


WC मध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक पॉवरप्ले धावसंख्या



  • 79/0 वि. इंग्लंड, 2023*

  • 61/0 वि. न्यूझीलंड, 2019

  • 50/1 वि. बांगलादेश, 2023

  • 48/0 वि. बांगलादेश, 2019

  • 40/1 वि. भारत, 2023


वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या सलामीवीरांसाठी 50+ स्कोअर



  • 62 - रहमत शाह विरुद्ध WI, लीड्स, 2019

  • 51 - जावेद अहमदी विरुद्ध SCO, ड्युनेडिन, 2015

  • 50* - रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध ENG, दिल्ली, 2023*


इतर महत्वाच्या बातम्या