मुंबई: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं कारकीर्दीत पहिल्यांदाच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या कसोटीत अँडरसननं आठ विकेट्स घेऊन इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याच कामगिरीच्या जोरावर अँडरसननं अव्वल स्थानी झेप घेतली.


 

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा आर अश्विन दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या आणि रवींद्र जाडेजा सहाव्या स्थानावर आहे.

 

कसोटी फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर असून, इंग्लंडच्या ज्यो रूटनं दुसरं आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसननं तिसरं स्थान कायम राखलंय. कसोटी फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाला टॉप टेनमध्ये स्थान मिळालेलं नाही. तर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताच्या आर अश्विननं अव्वल स्थान कायम राखलं.