मुंबई: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विजय साजरा करताना पाहण्याचं मुंबईकर चाहत्यांचं स्वप्न आज अधुरंच राहिलं. धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारत 'अ' संघावर इंग्लंडनं तीन विकेट्स आणि सात चेंडू राखून मात केली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या वन डे सराव सामन्यात भारतानं इंग्लंडला 305 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडनं सात विकेट्सच्या मोबदल्यात 307 धावांची मजल मारून विजय साजरा केला. इंग्लंडच्या सॅम बिलिंग्सनं 93 धावांची आणि जेसन रॉयनं 62 धावांची खेळी केली. तर जोस बटलरनं 46, अॅलेक्स हेल्सनं 40 आणि लियाम डॉसननं 41 धावा फटकावल्या.

भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक पाच विकेट्स काढल्या. त्याआधी भारतासाठी अंबाती रायुडूनं शतक ठोकलं होतं. तर धोनीनं नाबाद 68, शिखर धवननं 63 आणि युवराज सिंगनं 56 धावांची खेळी केली.