लातूर: किल्लारीला भूकंपाचा सौम्य धक्का, भूकंपाची तीव्रता 1.6 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू लातूरपासून 40 किमी अंतरावर
------------------------------------
पुणे : PMPML च्या बसला गणेशखिंड रस्त्यावरील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्सजवळ आग, सर्व प्रवासी सुखरुप
-----------------------------------------
मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचं पुन्हा आंदोलन, दिवा-रोहा गाडी उशिरा आल्याने संतप्त प्रवासी रुळावर उतरले
-----------------------------------------
ठाणे महापालिकेची निवडणूक लढणार नाही, यापुढे पक्षाचे काम करणार, ठाण्याचे महापौर संजय मोरे यांचा निर्धार
-----------------------------------------
राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांना असलेल्या आयकर सवलतींना आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली..
हेडलाईन्स:
1. तेजबहाद्दूर यांच्यावरील आरोप पत्नीनं फेटाळले, जेवणासंदर्भातल्या व्हायरल व्हिडीओमुळे बीएसएफची अब्रू वेशीला, डीआयजींमार्फत चौकशी
-----------------------
2. नोटाबंदीमुळे बँकांमध्ये जमा झालेले 3 ते 4 लाख कोटी बेहिशेबी, आयकर खात्याच्या सुत्रांची माहिती, 80 हजार कोटीच्या कर्जाची रोखीत परतफेड
-----------------------
3. भारत सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर, व्हायब्रंट गुजरात परिषदेत मोदींचा दावा, रतन टाटांकडून मोदींचं कौतुक
-----------------------
4. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, मनिष सिसोदियांची घोषणा, पंजाबच्या आखाड्यात चुरस वाढली
-----------------------
5. उद्धव ठाकरेंचे पालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचे संकेत, मातोश्रीवर शाखाप्रमुख, इच्छुकांच्या मुलाखती, तर राज यांचेही युतीसाठी पॉझिटिव्ह संकेत
-----------------------
6. पुण्याच्या पालकमंत्र्यांना गुन्हेगारांचा पुळका, हत्या, अपहरणाचे गुन्हे असलेल्या विठ्ठल शेलारला भाजपात प्रवेश, निवडणुकांआधी दहशत असणाऱ्यांचं इनकमिंग
-----------------------
७. ओम पुरी यांच्या मृत्यूला धक्कादायक वळण, नंदिता पुरी यांच्या दाव्यामुळे घातपाताचा संशय बळावला, पोलिसांना व्हिसेरा रिपोर्टची प्रतीक्षा
-----------------------
८. साताऱ्यातल्या पालीमध्ये खंडोबाची यात्रा, देशभरातून 7 लाख भाविक दाखल, पहिल्यांदाच हत्तीशिवाय मिरवणूक
-----------------------