गुजरात लायन ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांची तंबी
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2016 05:57 PM (IST)
मुंबई : गुजरात लायन्सचा अष्टपैलू खेळाडू, वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांनी फटकारलं. पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याला तंबी देण्यात आली. शनिवारी झालेल्या चुरशीच्या लढाईत गुजरात लायन्सनं मुंबई इंडियन्सचा तीन विकेट्सनी पराभव केला होता. त्या सामन्यात गुजरातच्या डावातील बाराव्या षटकात ब्राव्हो बाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. त्यावर ब्राव्होनं मैदानातच नाराजी व्यक्त केली होती. याविषयीची तक्रार पंचांनी सामनाधिकारी चिन्मय शर्मा यांच्याकडे केली होती. ब्राव्होनं आपली चूक कबूल केल्यामुळे सामधिकाऱ्यांनी त्याला तंबी देऊन सोडून दिलं.