मुंबई : या वर्षाच्या अखेरीस अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिली आहे. पुढच्या रामनवमीपर्यंत भव्य राम मंदिर उभं राहिल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ओवेसी, शहाबुद्दीन यांच्यासह अनेक मुस्लिम नेत्यांशी आपण चर्चा केली असून एका बाजूला राम मंदिर आणि दुसरीकडे मशिद बांधण्याचा पर्याय सुचवल्याचंही स्वामींनी सांगितलं. यावर, 'पैसे खाल्ल्याचा आरोप आमच्यावर होऊ नये, म्हणून कोर्टात या पर्यायाबद्दल बोला, मात्र आम्हाला काही
आक्षेप नाही' असं मुस्लिम नेत्यांनी म्हटल्याचं सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितलं.
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही राम मंदिर बांधण्याच्या पर्यायासंदर्भात चर्चा केल्याचंही स्वामी यांनी म्हटलं आहे.